जरा जपून.....


जरा जपून.....

बोलतांना जरा जपून बोलावे 
कधी शब्द ही अर्थ बदलतात...

चालतांना जरा जपुन चालावे
कधी रस्ते ही घात करतात....

ओळखतांना जरा जपून ओळखावे 
कधी माणसे ही रंग बदलतात ....

पाऊल टाकताना जरा जपून टाकावे 
कधी फुले ही काटे बनतात .....

वागतांना जरा जपून वागावे 
कधी आपले ही भाव खातात....

नाते जोडतांना जरा जपून जोडावे 
कधी नकळत धागे ही तुटून जातात....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" आय. सी.सी. चॅम्पियन ट्रॉफी २०२५ "

स्वाभिमान – माणसाची खरी ओळख....