पोस्ट्स

शिक्षक... म्हणजे आयुष्याचे खरे गुरु !

शिक्षक... म्हणजे आयुष्याचे खरे गुरु !  अज्ञानाच्या अंधारातून, झानाची वाट दाखवतात,  हातात खडू घेऊन शिक्षक,  आयुष्याचे धडे शिकवतात...!  फळ्यावरची अक्षरं मिटतात,  पण शिकवण मनात राहते,  शाळेची घंटा थांबते कधितरी,  पण गुरूंची शिकवण आयुष्यभर साथ देते...!  चुका झाल्या तर रागावतात,  पण त्यामागे प्रेमच असतं,  आपण मोठं व्हावं यासाठी,  त्यांचं प्रत्येक शब्द झटत असतं...!  आई-बाबा देतात जन्म,  पण जगण्याची दिशा देतात,  पडल्यावर पुन्हा उभं राहायला,  आपले शिक्षकच शिकवतात...!  पुस्तकांच्या पानांपलीकडे,  ते जीवन वाचायला शिकवतात,  यश मिळालं तर नम्र राहा,  अपयश आलं तर पुन्हा लढायला सांगतात...!  गुरु म्हणजे केबळ व्यक्ती नाही,  गुरु म्हणजे संस्कारांची शिदोरी,  गुरु म्हणजे अंधारातली वाट,  आणि स्वप्नांना मिळणारी नवी पहाट...!  जग कितीही मोठं झालं,  तरी एक सत्य कायम राहील,  आपल्या यशाच्या प्रत्येक पायरीवर,  गुरुंच्या संस्कारांची सावली असेल...!  म्हणूनच आज मनापासून म्हणतो,...

माझ्या social media प्लॅटफॉर्म वरील सगळ्या लिंक्स

इमेज
WhatsApp Group Link WhatsApp Channel Link Instagram Page Link YouTube Channel Link

स्वाभिमान – माणसाची खरी ओळख....

इमेज
स्वाभिमान – माणसाची खरी ओळख.... " स्वाभिमान " हा फक्त एक शब्द नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा कणा आहे. पैसा, पद किंवा प्रसिद्धी यापेक्षा स्वतःचा स्वाभिमान जपणारी व्यक्ती समाजात वेगळी ओळख निर्माण करते. कारण ज्याच्याकडे स्वाभिमान असतो, तो कोणासमोरही स्वतःची किंमत कमी होऊ देत नाही. स्वाभिमान म्हणजे अहंकार नव्हे. अहंकार माणसाला इतरांपेक्षा मोठे असल्याची भावना देतो, तर स्वाभिमान स्वतःच्या मूल्यांची जाणीव करून देतो. स्वाभिमानी व्यक्ती इतरांचा आदर करते, पण स्वतःचा अपमान सहन करत नाही. ती कोणाच्याही चुकीच्या दबावाखाली वागत नाही आणि तत्त्वांशी तडजोड करत नाही. आजच्या स्पर्धेच्या आणि स्वार्थाच्या जगात अनेक वेळा लोक स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून तडजोड करतात. परंतु क्षणिक फायद्यासाठी गमावलेला स्वाभिमान पुन्हा मिळवणे कठीण असते. म्हणूनच स्वार्थासाठी झुकण्यापेक्षा स्वाभिमानाने उभे राहणे अधिक महत्त्वाचे आहे. स्वाभिमान माणसाला आत्मविश्वास देतो, योग्य निर्णय घेण्याची ताकद देतो आणि संकटातही खंबीरपणे उभे राहण्याची प्रेरणा देतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वाभिमानी ...

" गुरू कधी कौतुक करत नाही "

इमेज
सचिन जेव्हा क्रिकेट खेळायचा  चेंडुला जोरात फटकारायचा  पण आचरेकर सर शांतच राहायचे  "वा !" असं कधीच म्हणायचे नाही...  ते म्हणायचे - "पुन्हा खेल बघू या "  "थोडं अजून सुधारू या " कधीच दिलं नाही टाळ्यांनी साथ,  फक्त शिकवत राहिले त्याच्या पाठीमागे हात ... तसंच माझंही एक कवितेचं नात  मी लिहितो कविता मनापासून खास,  पण गांगुर्डे सर काहीच नाही म्हणत  न "छान" न "खुपच सुंदर" असं काहीच नाही म्हणत.... ते फक्त बघतात शब्दांचा खेळ  कधी म्हणतात - "हे थोड नीट मांड"  मला वाटायचं - एकदा तरी दाद द्या ना सर  पण नंतर कळलं - हेच आहे त्यांचं खरं वरदान.... कारण गुरु कधी फक्त कौतुक करत नाही, तो घडवतो, घडवत राहतो- सांगत न बसता काही  गांगुर्डे सरांच्या नजरेत असतो अर्थ खोल  त्यांचं मौनच असत माझ्या कवितांना दिशा देणारं बोल....                                             - मुकेश गावित

🪔 आला दिवाळीचा सण आला 🪔

इमेज
घराघरात उजेड झळकला सुगंध फुलांचा दरवळला रांगोळीत रंग खुलला आला सण दिवाळीचा आला.... फटाक्यांचा आवाज गडगडला चांदण्यांनीही प्रकाश टाकला लहानग्यांचा जल्लोष दुमदुमला आला सण दिवाळीचा आला.... आईच्या हातचा गोडवा खुलला लाडू-करंजीचा सुगंध दरवळला सुखाचा वर्षाव अंगणात झाला आला सण दिवाळीचा आला.... नवीन कपड्यांचा रंग खुलला चेहऱ्यावर हसू उमटला प्रेमाचा दीप मनात पेटला आला सण दिवाळीचा आला.... सारे भेटले आपल्या नातेवाईकांला गप्पांमध्ये ओघ वाहिला आनंदाचा सोहळा साजरा झाला आला सण दिवाळीचा आला.... सत्कर्माची वाट धरू चला द्वेष, राग सगळा दूर टाकला प्रेम, शांतीचा दीप लावला आला सण दिवाळीचा आला.....

कुसुमाग्रजांना वंदन

इमेज
शब्दांना त्यांनी दिला नवा विचार, सत्यासाठी दिला निर्भीड हुंकार. मराठी भाषेचा घेतला आधार, म्हणूनच ते साहित्याचे शिल्पकार. गरिबांचा आवाज झाले उच्चार, अन्यायाविरुद्ध केला प्रहार. कविता, नाटकांचा केला विस्तार, शब्दांतून दिला सुंदर संस्कार. भाषेला दिला त्यांनी मानाचा आकार, माणुसकीचा दिला जगाला आधार. अंधारात पेटवला आशेचा दीपंकार, विचारांचा वाहता ठेवला प्रवाहकार. आज जयंती दिनी नमन नमस्कार, तुमचे शब्दच आमचे खरे मार्गकार. कुसुमाग्रज — मराठीचा खरा अभिमानकार, सदैव स्मरणात राहणारा थोर विचारकार. कुसुमाग्रजांच्या जयंती निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐

जरा जपून.....

इमेज
जरा जपून..... बोलतांना जरा जपून बोलावे  कधी शब्द ही अर्थ बदलतात... चालतांना जरा जपुन चालावे कधी रस्ते ही घात करतात.... ओळखतांना जरा जपून ओळखावे  कधी माणसे ही रंग बदलतात .... पाऊल टाकताना जरा जपून टाकावे  कधी फुले ही काटे बनतात ..... वागतांना जरा जपून वागावे  कधी आपले ही भाव खातात.... नाते जोडतांना जरा जपून जोडावे  कधी नकळत धागे ही तुटून जातात....