शिक्षक... म्हणजे आयुष्याचे खरे गुरु !

शिक्षक... म्हणजे आयुष्याचे खरे गुरु ! 

अज्ञानाच्या अंधारातून,
झानाची वाट दाखवतात, 
हातात खडू घेऊन शिक्षक, 
आयुष्याचे धडे शिकवतात...! 


फळ्यावरची अक्षरं मिटतात, 
पण शिकवण मनात राहते, 
शाळेची घंटा थांबते कधितरी, 
पण गुरूंची शिकवण आयुष्यभर साथ देते...! 


चुका झाल्या तर रागावतात, 
पण त्यामागे प्रेमच असतं, 
आपण मोठं व्हावं यासाठी, 
त्यांचं प्रत्येक शब्द झटत असतं...! 


आई-बाबा देतात जन्म, 
पण जगण्याची दिशा देतात, 
पडल्यावर पुन्हा उभं राहायला, 
आपले शिक्षकच शिकवतात...! 


पुस्तकांच्या पानांपलीकडे, 
ते जीवन वाचायला शिकवतात, 
यश मिळालं तर नम्र राहा, 
अपयश आलं तर पुन्हा लढायला सांगतात...! 


गुरु म्हणजे केबळ व्यक्ती नाही, 
गुरु म्हणजे संस्कारांची शिदोरी, 
गुरु म्हणजे अंधारातली वाट, 
आणि स्वप्नांना मिळणारी नवी पहाट...! 


जग कितीही मोठं झालं, 
तरी एक सत्य कायम राहील, 
आपल्या यशाच्या प्रत्येक पायरीवर, 
गुरुंच्या संस्कारांची सावली असेल...! 


म्हणूनच आज मनापासून म्हणतो, 
तुमच्या ऋणांची परतफेड नाही, 
तुम्ही दिलेल्या झानापेक्षा मोठी, 
या जगात दुसरी संपत्तीच नाही...!

 शिक्षक हेच आपले गुरु, 
आणि गुरु हेच आयुष्यांचे खरे शिल्पकार! 


शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकबांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा....!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" आय. सी.सी. चॅम्पियन ट्रॉफी २०२५ "

स्वाभिमान – माणसाची खरी ओळख....

जरा जपून.....