" गुरू कधी कौतुक करत नाही "
सचिन जेव्हा क्रिकेट खेळायचा
चेंडुला जोरात फटकारायचा
पण आचरेकर सर शांतच राहायचे
"वा !" असं कधीच म्हणायचे नाही...
ते म्हणायचे - "पुन्हा खेल बघू या "
"थोडं अजून सुधारू या "
कधीच दिलं नाही टाळ्यांनी साथ,
फक्त शिकवत राहिले त्याच्या पाठीमागे हात ...
तसंच माझंही एक कवितेचं नात
मी लिहितो कविता मनापासून खास,
पण गांगुर्डे सर काहीच नाही म्हणत
न "छान" न "खुपच सुंदर" असं काहीच नाही म्हणत....
ते फक्त बघतात शब्दांचा खेळ
कधी म्हणतात - "हे थोड नीट मांड"
मला वाटायचं - एकदा तरी दाद द्या ना सर
पण नंतर कळलं - हेच आहे त्यांचं खरं वरदान....
कारण गुरु कधी फक्त कौतुक करत नाही,
तो घडवतो, घडवत राहतो- सांगत न बसता काही
गांगुर्डे सरांच्या नजरेत असतो अर्थ खोल
त्यांचं मौनच असत माझ्या कवितांना दिशा देणारं बोल....
- मुकेश गावित
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा