" आम्ही आदिवासी "


आम्ही डोंगर दऱ्याचे रहिवासी, आमचे नाते निसर्गाशी 
आम्ही झाडी जंगलचे रहिवासी, आमचे नाते निसर्गाशी 
मूळमालक आहोत आम्ही, जल ,जंगल ,जमीनचे ....


धार्मिक श्रद्‌धा आहे आमच्यात, निसर्गाशी संबंधित 
विविध कला आहे आमच्यात, निसर्गाशी संबंधित 
डोंगऱ्या देवाला पुजून, जपणार आदिम संस्कृती....

पूर्वी कंदमुळे खाऊन, पोटाला आधार मिळतं
पुर्वी शिकार करून, पोटाला आधार मिळतं 
आम्ही रक्षक आहोत, जल ,जंगल, जमीनचे ....

आमच्या वेगवेगळ्या जमाती, तश्या रुढी-परंपरा 
आमच्या वेगवेगळ्या बोलीभाषा, तश्या रुढी-परंपरा 
निसर्ग देवाला पुजून, जपणार आदिम संस्कृती.... 

धाडस, संयमता आमच्यात, जगतो संघर्ष करून 
जिद्दी चिकाटी आमच्यात, जगतो संघर्ष करून 
आम्ही आहोत हक्कदार, जल, जंगल, जमीनचे.....

                                                - मुकेश गावित

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" आय. सी.सी. चॅम्पियन ट्रॉफी २०२५ "

स्वाभिमान – माणसाची खरी ओळख....

जरा जपून.....