" कोण सांगेल ह्या लहानश्या जीवाला ...."

                   
जगात तोड नाही ज्ञानाला
मुले बसत नाही अभ्यासाला
लागले कॉपीच्या नादाला 
अभ्यासाशिवाय पर्याय नाही कोणाला
सांगणार कोण ह्या लहानश्या जीवाला....
      
 मुलांना शिक्षणाचा महत्व कळेना
 अन् पुस्तकं हातात घेईना 
 की पुस्तकं हातात येईना
 मग शिकवलेलं काहीच कळेना 
 तरी मुल अभ्यासाकडे वळेना....

सकाळी घ्यावे वाटते चहा सोबत खारी
मुलांना वाटते घ्यायची उंच भरारी
पण अभ्यासात नाही तयारी 
पुढे आहे खाचखळग्यांची मोठी दरी
मग कशी चढाल आयुष्याची पायरी....

मुलांना आवडते मोबाईल, दुरदर्शन                          
रिचार्ज नसेल तर येत डोक्याला टेन्सन
Instragam  वर सांगतात कर स्टोरी मेन्सन
अवगत आहे नुसती फक्त फॅशन  
मग,परिक्षेच्या वेळेला करावे लागते कॉपीचे दर्शन

मलं झाली सोशल मीडियावर व्यस्त
होत चालली अभ्यासग्रस्त
मोबाईल व इंटरनेट वाटू लागले मस्त
परिक्षेच्या वेळेला झाले खस्त 
शिक्षकांचे झाले दुर्लक्ष की कॉपी चालते जबरदस्त....

                                                   - मुकेश गावित

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" आय. सी.सी. चॅम्पियन ट्रॉफी २०२५ "

स्वाभिमान – माणसाची खरी ओळख....

जरा जपून.....