".....मग.....परिक्षा घ्यायचीच का ? "

आनंदाने शिकायला खूप आवडते
पण परिक्षा मात्र नकोशी वाटते 
समजून घ्या आम्हां मुलांना 
तुम्ही मोकळे कराल आमच्या सक्तगुणांना 
......मग..... परिक्षा घ्यायचीच का ?  || २ || 

 एकाच चाचणीत सगळं मोजता 
ते आमच्यासाठी योग्य आहे का ? 
परिक्षव्यतिरिक्तही माणूस घडतो 
हे कधीतरी सांगाल का ?
......मग......परिक्षा घ्यायचीच का ? || २ || 

अभ्यास करतो, पण विसरून जातो 
हे तर आमचं कॉमन उत्तर 
आमची स्वप्नेही वेगवेगळी आहेत.
 गुणवत्तेसाठी वेगळं काही कराल का ?
..... मग..... परिक्षा  घ्यायचीच का ? || २ || 

वाटते भिती परिक्षा जवळ आल्यावर 
धडधड वाढत पेपर हातात पडल्यावर 
सगळे विद्यार्थी कौशल्यवाण परिक्षा केंद्रावर 
पेपर चांगला जाईल यासाठी वेगळं काही कराल का ? 
......मग...... परिक्षा घ्यायचीच का ?  || २ || 

पेपर-खराब गेले तर दुःख होते 
निकालाचा दिवस आला कि धडधड वाढते 
अभ्यासू मुलांचाही निकाल कमी लागतो 
तो आयुष्याचा शेवटचा दिवस समजायचे काn?
......मग...... परिक्षा घ्यायचीच का ? || २ || 

आमचं मन अभ्यासातून भरकटलेलं 
पुस्तक उघडतो कि डोळे मिटतात 
विदयार्थ्यांमध्ये अनेक कलागुण असतात 
त्यावर आयुष्य आमचे घडवाल का ?
.....मग.....परिक्षा घ्यायचीच का ? || २ || 

रोज शाळेत येतो वर्गात बसतो 
शिकवलेलं ऐकतो अभ्यास करतो 
तरीही पेपर अवघडच जातो. 
परिक्षव्यतिरिक्त आयुष्य घडवत असाल तर
...... मग...... परिक्षा घ्यायचीच का ?
...... मग...... परिक्षा घ्यायचीच का ?....
     
          
                                            - मुकेश गावित
                                              

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" आय. सी.सी. चॅम्पियन ट्रॉफी २०२५ "

स्वाभिमान – माणसाची खरी ओळख....

जरा जपून.....