" माझी अलंगूण आश्रमशाळा "
गावीत साहेब आहेत संस्था चालवायला
प्रवेशोत्सवाने सुरुवात आमच्या शाळेला
गरीबांची पोरं येतात रोज शिकायला
गावीत साहेब सज्ज शैक्षणिक विकास करायला.....
मोठं मैदान आहे खेळायला
सकाळ-संध्याकाळ मुलं जातात सरावाला
ऊन पाऊस जाणवत नाही शरीराला
राज्यस्तरावर भक्कम आहेत घाम फोडायला
जिवाचे रान करून ट्रॉफी आनती आश्रमशाळेला...
उत्साही असतात गुरु ज्ञान दयायला
उतावीळ असतात विद्यार्थी स्मरणाला
पहाट - रात्री बसतात अभ्यासाला
यश मिळतयं त्यांच्या गुणवत्तेला
अभिमान आमच्या अभ्यासु विद्यार्थ्यांला....
मोठ्याने सहभागी होती सांस्कृतिक कार्यक्रमाला
लगेच तयार पुष्पा-श्रीवल्ली व्हायला
पत्रिका वाटणार विशेष आमंत्रणाला
हजारो लोकं येतात कार्यक्रम पाहायला
शोभा येते आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला....
हुशार लेकर भिडतात स्पर्धेला
कुणी एव्हरेस्ट डोंगर कवेत घ्यायला
कुणी खेलो इंडिया गाजवायला
कुणी अल्टीमेटचा हिरो बनायला
म्हणून, राज्यात स्थान आमच्या आश्रमशाळेला....
गुणवत्तेत प्रथम क्रमांक मिळविला
शंभर टक्क्याचा निकालू आमच्या शाळेला
सलाम अष्टपैलु विद्यार्थ्यांच्या कर्तुत्वाला
सार्थ अभिमान आमच्या आश्रमशाळा विभागाला
सार्थ अभिमान आमच्या आश्रमशाळा विभागाला....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा