" शेतीचा राजा – बैल "


सकाळ झाली सूर्य उगवला,
गाव सारा सणात न्हावला।
बैलांची झाली छान सजावट,
गंध फुलांचा दरवळला भरकट....

ढोल-ताशांचा झाला गजर,
मिरवणुकीत नाचती लहानथोर।
बैलांसाठी आनंदाचा उत्सव,
साऱ्या गावात जल्लोष भरभर....

गळ्यात फुलांचा सुंदर हार,
सिंगा रंगीत उठला फार।
गोड-धोडाची मेजवानी झाली,
सर्वत्र खुशाली आनंद वाहिली....

बैल आमुचे शेतीचे सोबती,
दिवस-रात्र कामात व्यस्त होती।
त्यांच्या जोरावर शेती उभी,
शेतकऱ्यांची स्वप्ने होई रुबी....

संध्याकाळी पुन्हा गाणी झाली,
लोकांनी नाचून मजा केली।
गावभर हसरा चेहरा दिसे,
आनंद नाचता सर्वत्र असे....

बैलपोळा सण आपुला खास,
कृतज्ञतेचा यातून होई सुवास
शेतकरी-निसर्ग नाते जपतो,
आपल्या परंपरा अभिमानाने जपतो....


                                    - मुकेश गावित 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" आय. सी.सी. चॅम्पियन ट्रॉफी २०२५ "

स्वाभिमान – माणसाची खरी ओळख....

जरा जपून.....